श्रीनिवासन पुन्हा BCCI च्या अध्यक्षपदी?

July 31, 2013 2:09 PM0 commentsViews: 46

Image img_239702_nshrinivasan_240x180.jpg31 जुलै : एन. श्रीनिवासन हे पुन्हा एकदा बीसीसीआयची सूत्र हाती घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. बीसीसीआयची चौकशी समिती बेकायदेशीर असल्याचा मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा बीसीसीआयवर बंधनकारक नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. या चौकशी समितीने श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांना क्लीन चिट दिलीये. मात्र, श्रीनिवासन यांनी राजीनामा दिला नव्हता. ते फक्त बाजूला झाले होते, असं सूत्रांचं म्हणणं आहे. शुक्रवारी बीसीसीआयच्या वर्किंग कमिटीची बैठक होतेय. श्रीनिवासन बोर्डाचे अध्यक्ष या नात्यानं या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील अशी शक्यता आहे. पण श्रीनिवासन पुन्हा अध्यक्ष होण्यास बोर्डाचे सर्व सदस्य अनुकूल नाहीत, अशी माहिती आहे.

close