‘शोभा डे बेईमान, गुन्हा दाखल करा’

July 31, 2013 5:57 PM11 commentsViews: 4301

raj on shobha de31 जुलै : प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी केलेल्या ट्वीटचा वाद आता चांगलाच पेटलाय. स्वतंत्र मुंबई का नको, असा ट्वीट शोभा डे यांनी केला होता. पण शिवसेना आता या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शोभा डे यांना बेईमान ठरवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव आहे. मुंबईचंच खाऊन महाराष्ट्राशी शोभा डे यांनी बेईमानी केलीय. हा महाराष्ट्र द्रोह आहे अशा आशयाचं पत्रकच संजय राऊत यांनी काढलंय.

शोभा डे यांच्या मुंबईबाबतच्या ट्वीटवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तिखट प्रतिक्रिया दिलीय. ‘मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करणं म्हणजे घटस्फोट घेण्याइतकं सोपं नाही’ असा टोला त्यांनी शोभा डे यांना लगावलाय. दरम्यान, शोभा डे यांनी वाद सुरू झाल्यामुळे सारवासारव केलीय. आपण गंमतीनं उपहासानं असं ट्वीट केलं होतं असा खुलासा डे यांनी केलाय.

शोभा डे यांचं ट्विट
‘महाराष्ट्र आणि मुंबई??? का नको? मुंबईनं नेहमीच आपला वेगळेपणा राखलाय. शक्यता अनेक आहेत.’

 • sandeep shelar

  शरीरात रक्ताचा शेवटचा थेब असे पर्यंत मुंबई महाराष्ट्रा पासून वेगळी होऊन देणार नाही संदीप शेलार बलिदनाला तर केवा पण तयार आहे

 • sandeep shelar

  मुंबई आणि महाराष्ट्राला तोडण्याची स्वप्ने कोणीही पाहु नका …आम्ही शांत आहे तसेच राहू द्या

 • PRASHANT

  WHO IS SHE? IGNORE HER. SHE THINKS SHE IS NOTICEABLE PERSON WHICH SHE IS NOT

  • Anil Thite

   nusta publicity milvnyasathi he baya konya pn margavar jail.. tyamule hila ati mahtva dene kadhich yogya nahi

 • Pankaj

  Shobhhaaa leave Maharashtra today.

 • Ganesh

  मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे स्वप्न कोणीही पाहू नये.

 • Mahesh Ligade

  tya vishayat kuni airya-gairya ni nak khupasnyachi kay garaj nahiye…….ok???

  • Gorakh

   that is publicity stunt …..so don`t take seriously

 • Mahesh Ligade

  Mumbai kunachya bapchi jahagiri nahiye……..lakshat thev….

 • Sachin Thorat

  प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा अधिकार सर्वाना आहे, तैलगंना ला राजकीय लोक वेगळा state करू शकतात तर हीच लोक फायद्या साठी मुंबई ला पन वेगळे करू शकतात. महाराष्ट्रातल्या नेत्यांना मुंबई मध्ये असलेली प्रश्न सोडवायला वेळ नाही पण twiiter बघायला वेळ आहे.

 • manoj s.

  हिला काय कळणार 106 हुत्तात्म्यांची संयुक्त महाराष्ट्रा साठी ची बलिदने.. थोड्या दिवसानी बाई म्हणतील भारताचे तुकडे करा आणि अमेरिका किवा इंग्लेंड ला जोडा किवा छोटे छोटे देश निर्माण करा.. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहील.. हिला मुंबईत पाहूल ठेऊ देऊ नका.. शोभा च्या अंगात मोरारजी देसाई आला वाटते..

close