मनसेची ‘दुनियादारी’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ला थांबवा नाहीतर..

July 31, 2013 5:38 PM6 commentsViews: 3027

mns on chenni express31 जुलै : ‘दुनियादारी’ हा मराठी सिनेमा काढून ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सिनेमाचा शो लावला तर सिनेमागृह बंद पाडू अशी धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेनं मुंबईतल्या सिंगल स्क्रीन थिएटर्सचालकांना दिलीय. मनसे उद्या यासाठी आंदोलन करणार आहे असं मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरांनी सागितलंय. दिग्दर्शक रोहित शेट्टी दिग्दर्शित चेन्नई एक्सप्रेस हा सिनेमा येत्या आठ ऑगस्टला प्रदर्शित होतोय.

 

या सिनेमात शाहरूख खान, दिपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका आहे. विशेष म्हणजे किंग खान या सिनेमात असल्यामुळे देशभरात एकाच वेळी हजारो मॉल आणि थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रत्येक वेळा एखादा मोठा हिंदी सिनेमा रिलीज होत असेल तर बाकीच्या सिनेमांना थिएटर्समध्ये जागाच मिळत नाही. त्यातच मराठी सिनेमाची व्यथा याहूनही भयंकरच असते. दुनियादारी सिनेमा मुंबईत मोजक्याच स्क्रीनवर झळकतोय आणि त्यातही दुसर्‍याच आठवड्यात चेन्नई एक्स्प्रेस ‘येत’ असल्यामुळे मनसेच्या ‘इंजिन’ने ‘दुनियादारी’साठी ब्रेक लावलाय.

 • Swapnil Pophale

  The best will stay in the compition.

  • Pushkar Hate

   Yes but all should get an equal platform

 • Sachin Thorat

  MNS is doing a free publicity for Chennai Express.. Last time Sena did the negative publicity for My name is Khan… and movie was HIT

 • Vinay Dixit

  बरोबर आहे दुनियादारी हा मराठी चित्रपट सोडून चेन्नई एक्ष्प्रेस्स का दाखवावा? कारण दुनियादारी हा चित्रपट तुफान चालत आहे आणि किती तरी दिवसांनी मराठीत एक उत्कृष्ट चित्रपट निघालेला आहे. म्हणून एकदम correct

 • nitesh tetgure

  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेला निर्णय योग्य आहे….

 • Arvind Tandel

  Chennai Express la thambawa jo paryanta Duniadari Super fast express world record karat nahi

close