मंगलोरमधल्या श्रीरामसेनेने केली महिलांना मारहाण

January 26, 2009 4:55 PM0 commentsViews: 2

26 जानेवारी मंगलोर मंगलोरमधल्या पबवर हल्ला करून श्री राम सेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथल्या महिलांना मारहाण केली होती. त्याचे पडसाद आता देशभरात उमटत आहेत. पण, यावर निवेदन द्यायला कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी 36 तासांपेक्षा जास्त वेळ घेतला. श्रीरामसेनेच्या 40 कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला होता. त्यात दोन महिला जखमी झाल्या होत्या. पबमधल्या महिलांनी ड्रग्ज घेतलं होतं. आणि त्यांच्यावर कारवाई करायला पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यामुळे हा हल्ला केल्याचं श्रीरामसेनेनं सांगितलंय. कुणालाही मारहाण न करता त्यांना केवळ पबच्या बाहेर काढल्याचा दावा त्यांनी केला आहे. मीडिया चुकीचा प्रचार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. श्रीरामसेनेचा प्रमुख प्रमोद मुतालिक हल्ल्यानंतर फरार आहे. दरम्यान, श्रीराम सेनेशी कोणताही संबंध नसल्याचं सांगत भाजपनं हात झटकले आहेत. तर हल्लेखोरांवर कारवाई केल्याचं येडियुरप्पा यांनी सांगितलं.

close