भंगार रिक्षा-टॅक्सींना उद्यापासून कायमचा ब्रेक

July 31, 2013 7:53 PM0 commentsViews: 270

31 जुलै : 20 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या टॅक्सी आणि रिक्षा उद्यापासून मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार नाहीत. जुन्या टॅक्सी बंद करण्याचा परिवहन विभागाचा निर्णय उद्यापासून म्हणजे 1 ऑगस्टपासून अंमलात येणार आहे. या निर्णयामुळे जुन्या पद्मिनी टॅक्सी आता दिसणार नाहीत. पण सर्वच पद्मीनी टॅक्सी बंद होणार नसून ज्या टॅक्सींचं योग्यता प्रमाणपत्र संपत आहे अशाच टॅक्सी बाद होणार आहेत. मुंबईत सध्या 9 हजार पद्मिनी टॅक्सी आहेत, यापैकी 4500 पद्मिनी टॅक्सी उद्यापासून बाद होतील.

close