पवारांची गुगली,MCAची निवडणूक लढवणार

July 31, 2013 9:57 PM0 commentsViews: 998

sharad pawar31 जुलै : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार क्रिकेटमध्ये पुन्हा सक्रीय झालेत. मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ते लढवणार आहेत. मुंबई क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष रवी सावंत यांनीच ही घोषणा केलीय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांची संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी आतापासूनचं मोर्चेबांधणी सुरू झालीय. गेल्या निवडणुकीवेळी शरद पवार यांचा निवासी पत्ता बारामतीचा असल्यानं त्यांना निवडणूक लढवता आली नव्हती.

यंदा त्यांनी आपला पत्ता अधिकृतपणे बदलला आहे. आता ते मुंबईकर झाल्यामुळे त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झालाय. विशेष म्हणजे शरद पवार बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर पुन्हा कोणतीही किक्रेट समितीची निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा पवार यांनी केली होती. मात्र आता पवारांनी गुगली टाकत एमसीएची निवडणूक लढणार आहेत.

close