मनसेचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ ग्रीन सिग्नल

August 1, 2013 4:12 PM1 commentViews: 2166

mns on chenni express01 ऑगस्ट : ‘दुनियादारी’ आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’या दोन्ही सिनेमांच्या स्क्रीनिंगचा वाद अखेर मिटलाय. सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये दोन्ही सिनेमे आता एकत्र झळकणार आहे. चेन्नई एक्स्प्रेसचा दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दुनियादारी सिनेमाचे कलाकारही उपस्थित होते. सिंगल स्क्रीनवर दोनही सिनेमांसाठी वेळ ठरवून दिल्यामुळे या वादावर पडदा पडलाय.

 

दुनियादारी हा सिनेमा दर्जेदार असून तो चांगल्या प्रकारे सुरू आहे. एकूण 19 स्क्रीनवर हा सिनेमा झळकत आहे. त्यामुळे दुनियादारीचे शो रोखू नये. या प्रकरणावर आमची यावर चर्चा झाली असून दुनियादारी सिनेमा दिसेल आणि चेन्नई एक्स्प्रेस ही दिसेल. आता हा वाद मिटला आहे अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी दिली.

 

तर मनसेच्या पुढाकारामुळे हा वाद मिटलाय आणि मराठी रसिकांनी दुनियादारीला पसंती दिलीय त्याबद्दल अभिनेता स्वनिल जोशींने आभार मानले. बुधवारी मनसेच्या चित्रपट सेनेनं शुक्रवारी रिलीज होणार्‍या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ला विरोध दर्शवला होता. चेन्नई एक्स्प्रेसमुळे सिंगल स्क्रीन थिएटर्सचालकांनी दुनियादारीचे शो बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात मनसेनं थिएटर्स बंद पाडण्याचा इशारा दिला होता. अखेर 48 तासात मनसेच्या ‘दुनियादारी’ने घेत चेन्नई एक्स्प्रेसला हिरवा कंदिल दिला.

  • Rpi Raj Ghadge

    आर पी आय, बौद्ध कार्यकर्त्या बधल वाईट बोलणारा राज ठाकरे ह्याला काय आता दिसत नाही काय ? का त्याचे डोळे फुटले आहे का ?

    बुद्ध गया वर हमला झाला तरी तरी एक शब्द पण तोडातुन काडला नाही.आता काय मराठी माणुसकीचा प्रश्न निर्माण झाला नाही का ? का नाही समाजाला प्रबोदन केले .काय घरात बागड्या घालून बसला आहे का ? ……… तरी पण आमचा समाजातील लोकांना कळत नाही (मुलांना) त्याचा माघे कुत्र्यासाखे पाटी पाळतात लाज पण वाटत नाही ह्यांना त्यांना ………..

    संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी होत आहे शेतकऱ्यांच अतोनात नुकसान होत आहे. त्याच्याशी काही घेणदेणच नाहीये या महाराष्ट्र नवनिर्माण करायला निघालेल्या गाढवाला. शेवटी मुंबईत राहिलेला हा याला काय घंटा कळणार आहेत ? महाराष्ट्राचे प्रश्न. मुळात ठाकरे घराण्याला महाराष्ट्राचे मूळ प्रश्ने कधी समजलेलेच नाहीयेत. हे फक्त महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत.

    काहीही कामधंदा नसल्यासारखं दोन चिल्लर-ठील्लर चित्रपट घ्यायचे आणि त्याच्यावर राजकारण करायचं याला काही अर्थ आहे का ?

  • Pingback: ‘चेन्नई एक्स्प्रेस’सुसाट, ‘फस्ट डे’ला 33 कोटींची कमाई | IBN Lokmat Official Website

close