तेलंगणाविरोधात आंध्रामध्ये काँग्रेस मंत्र्यांचे राजीनामे?

August 1, 2013 2:20 PM0 commentsViews: 400

telangana01 ऑगस्ट : स्वतंत्र तेलंगणा निर्मितीच्या निर्णयाला विरोध म्हणून उर्वरित आंध्र प्रदेशातील काँग्रेसचे सर्व मंत्री राजीनामा देण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी सर्व मंत्री मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांच्याकडे राजीनामे सोपवण्याची शक्यता असल्याची माहिती सीएनएन आयबीएनला मिळाली.

 

यामुळे काँग्रेस पक्षासमोर अडचण येण्याची शक्यता आहे. स्वतंत्र तेलंगणाला हिरवा कंदिल देऊन काँग्रेसनं तेलंगणामधली स्वतःची स्थिती मजबूत केल्याचं मानलं जातंय. तेलंगणा राष्ट्र समितीनंही काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे तेलंगणा भागात काँग्रेस बळकट होतेय. पण सीमांध्रमध्ये मात्र उलटा परिणाम दिसून येतोय.

close