पंतप्रधानपदी कोण?, भाजप-संघाची बैठक सुरू

August 1, 2013 1:38 PM0 commentsViews: 417

Image img_196612_bjp_240x180.jpg01 ऑगस्ट : नवी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, अरूण जेटली आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे नेते उपस्थित आहेत. तर संघाचे सुरेश सोनी, रामलाल, भैय्याजी जोशी, दत्तात्रय होसबळे आणि मुरलीधर रेड्डी हे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. ही बैठक संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या बैठकीत ऑगस्ट अखेर पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावांची घोषणा करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

close