खासदार संजय राऊत यांना अटक

January 27, 2009 6:05 AM0 commentsViews: 2

27 जानेवारी, मुंबईहॉटेल इंटरकॉन्टिनेन्टल तोडफोडप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आलीये. गेल्या आठवड्यात शिवसेनेनं हिंसक आंदोलनं केली होती. त्याचसंदर्भात शिवसेना नेते आणि ' सामना ' या दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता होती. मुंबईत इंटर कॉन्टिनेन्टल या पंचतारांकित हॉटेलात शिवसैनिकांनी तोडफोड केली होती. या तोडफोडीचं नेतृत्व संजय राऊत यांनी केलं होतं. या हॉटेलात शिवसेनेची युनियन आहे. काही कामगारांना नोकरीवरून काढून टाकलं होतं. त्यांना परत कामावर घ्यावं या मागणीसाठी शिवसैनिकांनी तोडफोड केली. हॉटेलचे मालक ज्योती सुरी यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यांनी शिवसेनेवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारवर दबाव आणण्याची विनंती केली होती.

close