विदर्भाला 1,935 कोटींची मदत जाहीर

August 1, 2013 6:48 PM3 commentsViews: 281

cm pruthaviraj chavhan01 ऑगस्ट : राज्यात पावसानं थैमान घातलं असून त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने आता एकूण 1935 कोटी रुपयांची मदत घोषीत केली आहे. तत्कालिक आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठीची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पावसामुळे विदर्भात 107 जणांचा मृत्यू झालाय. तर राज्यातल्या मृतांचा आकडा आहे 237 इतका आहे.

मृतांच्या नातेवाईकांसाठी सरकारनं दीड लाखांची तर मुख्यमंत्री निधीतून एक लाख अशी एकूण अडीच लाखांची मदत जाहीर केलीय. तर विदर्भासाठी एकूण 2 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केल्याचा दावा सरकारनं केलाय. नागपूर, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरमध्ये पावसामुळे अतोनात नुकसान झालंय.

बुधवारी पावसात नागपूर आणि परिसरातून तीन जण वाहून गेलेत. तर अमरावतीमध्ये मोर्शी इथल्या सिंभोरा धरणाचे 13 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आलेत. वर्धा जिल्ह्यात गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.अप्पर वर्धा प्रकल्पाचे 13, लोअर वर्धा प्रकल्पाचे 31, बोर प्रकल्पाचे 8, बेंबळा प्रकल्पाचे 8 दरवाजे उघडण्यात आले आहे.

  • Vikas Dambhare

    केवळ घोषणा करायच्या आणि विसरून जायच्या. मदत सरकारी फाइलीत भिरभिर फिरवायची.

  • Vikas Dambhare

    मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात बाबा पुरग्रस्तांच्या भेटीसाठी येऊन गेले. अजून पावेतो पुरग्रस्त मदतीची वाट बघत आहे.

  • Mahesh Tad

    Madatichi rakkam janateparyan pohachu dya.. … 1,935 paiki faqt 35 koti tari janatela milatat ki nahi, te pahav lagel, nahitar sagala paisa netyanchya khishat

close