‘मोदींवर बोलण्यापूर्वी परवानगी घ्या’

August 1, 2013 7:27 PM0 commentsViews: 1662

Image rahul_gandhi_300x255.jpg01 ऑगस्ट : गुजरातचे मुख्यमंत्री आणि प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्यापूर्वी परवानगी घ्या असं फर्मान काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल गांधींनी काढलंय. टीव्हीवरील चर्चेत बोलणार्‍या व्यक्तींनी याबाबतची परवानगी घ्यावी असंही सांगण्यात आलंय. ही परवानगी देण्यासाठी दोन संयोजक नेमण्यात आले आहेत. काँग्रेसचा कुणीही प्रवक्ता परवानगीशिवाय बोलणार नाही. मोदींबद्दल कुणीही बोलायच्या अगोदर संयोजकांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. पक्षाने सांगितलेल्या माहितीपेक्षा अधिकची माहिती देण्यास प्रवक्त्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

close