‘आदर्श’वर चर्चा करण्यापासून सरकार पळ काढतंय-फडणवीस

August 1, 2013 8:40 PM0 commentsViews: 229

Image img_235812_fadanvis_240x180.jpg01 ऑगस्ट : आदर्श सोसायटी घोटळ्याच्या चर्चेपासून सरकार पळ काढत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. प्रमुख नेत्यांच्या खात्यांमधून आदर्शमधल्या अनेक फ्लॅटसाठी पैसे फिरवण्यात आल्याचा सनसनाटी आरोप फडणवीस यांनी केला.

दरम्यान, वादग्रस्त आदर्श घोटाळ्याच्या चौकशीचा न्यायालयीन आयोगाचा अंतिम अहवाल उद्या शेवटच्या दिवशी मांडला जाणार आहे. अशी माहिती सूत्रांना दिलीय. त्यामध्ये आदर्शच्या अहवालावर चर्चा करुन तो लागलीच विधिमंडळात मांडला जाणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली.

या आदर्श अहवालात माजी मुख्यमंत्र्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. तर सर्व खापर सनदी अधिकार्‍यांवर फोडण्यात आल्याचं समजतंय. गेल्या वर्षी राज्य सरकारनं आदर्श आयोगाचा अंतिम अहवाल विधी मंडळात मांडला होता.

close