‘माझ्या घरात जेवणावरून झगडे होतात,मग 12 रूपयात खायचं काय?’

August 1, 2013 9:03 PM2 commentsViews: 971

दीप्ती राऊत, नाशिक

01 ऑगस्ट : भाजीचा भाव 20 रूपये पाव किलो, मग 12 रुपयात खायचं काय आणि जगायचं कसं..राजकर्त्यांसाठी हा सवाल आहे मातंग समाजातल्या  महिलांचा. स्मशानातली राख चाळून गुजराण करणार्‍या या महिला. दारिद्र्याचे खरे चटके भोगणार्‍या. 50 रूपयाची कमाई आणि 70 रूपयाचा घरखर्च यात भरडल्या जाणार्‍या. स्मशानाच्या सरपणावर भाकरी शेकणार्‍या आणि प्रेतावरचे कपडे घालून दिवस काढणार्‍या…

इतरांकडे कशावरून भांडणं होतात माहीत नाही, पण माझ्या घरात जेवणावरून झगडे होतात अशी व्यथा संगीता रणशींगे  मांडताय. तर भाजीपाला 15-10 रुपये किलो,25 रुपये भाजी .. खायचं काय? असा सवाल जनाबाई डांगळे यांनी विचारलाय.

“मी घरकाम करते, नवरा मोलमजुरी करतो, हजार रुपयात भागत नाही..”संगीताताईंचं, जनाबाईंचं हे दु:ख दारिद्र्याचं राजकारण करणार्‍यांपर्यंत पोहोचतच नाही. 3 दिवस पुरवाव्या लागणार्‍या 1 किलो पिठासाठी त्यांना स्मशाणातल्या राखेत उतरावं लगातं. प्रेतावरचं खुडूकमुडूक शोधण्यासाठी चाललेला त्यांचा हा संघर्ष. त्यातून हाती लागतात शंभर-दीडशे रुपये. ते ही दहा जणींनी वाटून घ्यायचे. आणि त्यानंतर त्यावर घर चालवण्यासाठी झगडायचं..

लता साठे म्हणतात, 50 रूपयात दिवस चालवायचा. 1 किलो गहू, 5 रुपयाचं तेल, 3 रुपयाच्या मिरच्या… दुकानदार आता देतही नाही. महागाई झाली म्हणतो.!!
सरकार दरबारी ही दारिद्र्य रेषेखालील कुटुंब. त्यांच्या हक्काचा गहू रेशन दुकानात पोहोचतो, पण..यांच्यापैकी काहींचे नवरे गंगेवर गाड्या धुतात कर काहींचे मोलमजुरी करतात. दिवसा अखेरीस हातात पडणार्‍या शंभर रुपयांवर भाकरी भाजताना शरीर करपतं आणि मनही..

  • Nitin Jagtap

    हा विडियो राजकारण करणार्या बडव्याना दाखवा

  • Harshit Mhatre

    great news i hope everyone will see this

close