अण्णाभाऊ साठेंच्या जयंती कार्यक्रमाला मुख्यमंत्री गैरहजर

August 1, 2013 9:58 PM1 commentViews: 315

01 ऑगस्ट : आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने शासकीय कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्रात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हजर राहण्याचे कबुल करुनही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊनही आले नसल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी विधानभवनावर धडक मोर्चा काढला. मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी आलेल्या या महिला पुरुष कार्यकर्त्यांना विधानभवनाच्या गेटमध्येच ताब्यात घेतलं. त्यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत 4 महिला जखमी झाल्यात. मातंग समाजाच्या प्रश्नांकडे आणि अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी मुख्यमंत्री आतातरी लक्ष घालणार आहेत का ? असा प्रश्न मातंग सामाजाकडून विचारत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्विकारला तेंव्हा पासून त्यांनी अण्णाभाऊंच्या जयंती निमित्त कार्यक्रमाला गैरहजेरी लावली असा आरोप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी केला.

  • Rpi Raj Ghadge

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने त्यांचा प्रतिमेस त्रिवार वंदन , बाबाचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आहे मातंग समाजाने आर पी आय पक्षाल साथ द्यावी कारण तो पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबाच्या विचारातून निमण जालेला आहे . जर अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या विचाराला मानत होते तर त्याच्या विचारातून निमण जालेला पक्षाला का नाही मानणार जय भीम

close