मी तर पक्षाच्या खर्चाबद्दल बोललो होतो -मुंडे

August 2, 2013 4:29 PM1 commentViews: 1242

Image img_233802_munde_240x180.jpg02 ऑगस्ट : 2009 च्या लोकसभा निवडणूक खर्चाप्रकरणी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडेंनी निवडणूक आयोगाला उत्तर दिलंय. हे उत्तर 19 पानी आहे. त्यात त्यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन केलंय. पक्षाच्या संपूर्ण खर्चाबद्दल आपण बोललो होतो असं मुंडेंनी म्हटलं आहे.

 

तसंच निवडणूक आयोगाला खर्च तपासण्याचा अधिकार नसल्याचा दावाही त्यांनी केला. मीडियाने दाखवलेल्या बातम्या बघू नका, मी जे बोललो त्यांचा संदर्भ लक्षात घ्या. मी माझ्या पक्षाचा संपूर्ण खर्चाबदल बोललो होतो. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा 18 कोटींचा खर्च झाला होता मी चुकून 8 कोटी सांगितलं असं मुंडेंनी उत्तर दिलंय.
मुंडेंचं उत्तर
– फक्त मीडियाच्या बातम्या बघू नका
– माझ्या पूर्ण भाषणाचा संदर्भ लक्षात घ्या
– मी पक्षाच्या संपूर्ण खर्चाबाबत बोललो होतो
– 2009मध्ये पक्षानं 18 कोटी खर्च केले होते
– सभेमध्ये मी चुकून 8 कोटी असं सांगितलं
– माझ्याविरुद्ध कुणाचीही तक्रार नाही
– मी काळा पैसा, वाढणारा खर्च याबद्दल बोललो
– कार्यक्रमाचा विषय हा निवडणूक सुधारणा होता, हे आयोगानं लक्षात घ्यावं
– निवडणूक आयोगाला खर्च तपासण्याचा अधिकार नाही

  • Sachin Jadhavar

    greet mind sir ji…..

close