रिझर्व्ह बँकेची क्रेडिट पॉलिसी जाहीर

January 27, 2009 7:20 AM0 commentsViews: 46

27 जानेवारी, मुंबईरिझर्व्ह बँकेची क्रेडिट पॉलिसी जाहीर झालीये. यात आरबीआयनं बँकांसाठी कोणत्याही व्याजदरात बदल केलेला नसल्याचं जाहीर केलंय. रिझर्व्ह बँकेनं यावेळी रिव्हर्स रेपो,रेपो रेट आणि सीआरआरमध्ये कोणताही बदल केलेला नाहीये. त्यामुळे रेपो रेट साडेपाच टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट चार टक्के तर सीआरआर पाच टक्के कायम राहणार आहे. यापूर्वी संकेत दिल्याप्रमाणेच रिझर्व्ह बँकेचा हा व्याजदरांबाबत निर्णय आलेला आहे. दरम्यान यावर्षी जीडिपी सात टक्क्यांपेक्षा कमीच राहील असा अंदाज आरबीआयनं व्यक्त केलाय. महागाई दरही येत्या मार्चपर्यंत तीन टक्क्यांहून कमी होईल असं आरबीआयला वाटतंय. बँकानी नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स कमी करावेत अशी सूचनाही आरबीआयनं दिलीय आहे. रेपो रेट म्हणजे काय ? ज्या व्याजदरानं बँकांना आरबीआयकडून कर्ज मिळतं, त्याला रेपो रेट म्हणतात. आरबीआयनं रेपो रेट कमी केला तर बँकांना आरबीआयकडून लहान मुदतीची कर्ज मिळणं स्वस्त होतं. तर आरबीआयनं रेपो रेट वाढवला तर बँकांना मिळणार कर्ज महाग होतं.रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय ? रिव्हर्स रेपो रेट म्हणजे बँकांनी आरबीआयकडे पैसे ठेवल्यावर ज्या दराने व्याज मिळतं तो दर. हा दर कमी झाला तर बँकांना कमी व्याज मिळतं आणि व्याजदर वाढला तर बँकांना जास्त व्याज मिळतं.सीआरआर म्हणजे काय ? सीआरआर म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो. ती रक्कम जी बँकांना गॅरंटी म्हणून आरबीआयकडे ठेवावी लागते. सीआरआर कमी झाला तर बँकांना आरबीआयकडे कमी रक्कम ठेवावी लागेल. म्हणजे कर्ज द्यायला जास्त पैसा हातात असेल. सीआरआर वाढला तर जास्त पैसा आरबीआयकडे गॅरंटी म्हणून ठेवावा लागेल आणि ग्राहकांना कर्ज द्यायला कमी पैसा उरेल.

close