…तर मोदींमुळे भाजपचं नुकसान -पवार

August 2, 2013 8:27 PM2 commentsViews: 1920

02 ऑगस्ट : नरेंद्र मोदी भाजपचे पंतप्रधान उमेदवार झाल्यास भाजपला त्याचा फायदा होईल असं आपल्याला वाटतं नसल्याचं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. मोदी उमेदवार असल्यास इतर पक्ष भाजपच्या सोबत येणार नाही, असंही पवार यांनी म्हटलंय. सीएनएन आयबीएनला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी हे मत व्यक्त केलं. तसंच मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही. मी स्वत: लोकसभा निवडणूक लढवणार नाहीये. मला आमच्या मर्यादाही माहित आहेत अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भूमिका मांडली.
या मुलाखतीचा काही भाग

 

रुपश्री नंदा: राजकीय पक्षांना आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. मोदी कदाचित भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील. ही घोषणा येत्या काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. मोदींमुळे राजकारणात आणि पक्षांचं ध्रुवीकरण होईल असं तुम्हाला वाटतं का?

शरद पवार: मला माहीत नाही. मी हे समजू शकतो की हे एखाद्या राज्यातल्या एखाद्या नेत्याला अशा प्रकारे पंतप्रधानपदाचं उमेदवार घोषित करण्यात आलं तर त्या व्यक्तीला, त्याच्या पक्षाला फायदा होऊ शकतो. पण असंच सगळ्या भारतभर चित्र असेल हे मान्य करणं मला तरी अवघड वाटतं. लोकांना आता एका पक्षांचं सरकार नकोय, त्यांना आघाडी सरकार हवंय.लोकांना राजकीय पक्षांनी एका समान कार्यक्रम पत्रिकेवर काम करणारं सरकार हवंय. अशा वेळी इतर राजकीय पक्षांना मान्य असेल असं नेतृत्व हवं असतं. त्यामुळे भाजपला इतर पक्ष कितपत साथ देतील याबद्दल मला शंका आहे.

रुपश्री नंदा: सीएनएन आयबीएननं केलेल्या सर्व्हेत पंतप्रधान पदाचे सर्वात लोकप्रिय उमेदवार म्हणून मोदींना पसंती मिळालीयं. एखाद्या आघाडी सरकारचे पंतप्रधान, मोदी होऊ शकतील असं तुम्हाला वाटतं का?

पवार: असं मला काही वाटत नाही. अशा प्रकारचं नेतृत्व असलेल्या भाजपला इतर राजकीय पक्ष स्वीकारतील असं मला वाटत नाही.

 

‘पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही’

मी स्वत: लोकसभा निवडणूक लढवणार नाहीये. मला आमच्या मर्यादाही माहित आहेत. ज्या व्यक्तीला पंतप्रधान व्हायची अपेक्षा असते, त्याच्या पक्षाला कमीतकमी 30 ते 40 जागा जिंकाव्या लागतात. राष्ट्रवादी तर 30 ते 40 जागा लढलणारही नाहीय. आजच्या घडीला मला तिसर्‍या आघाडीची शक्यता दिसत नाही. येणारं सरकार काँग्रेस प्रणित किंवा काँग्रेसचा पाठिंबा असलेलं असेल. एकसंध राज्याला माझा पाठिंबा आहे. पण माझं हे ठाम मत आहे की, जर बहुसंख्य लोकंना स्वतंत्र राज्य हवं असेल आणि ते शक्य असेल, तर मी त्याच्या आड येणार नाही.

  • Sachin

    why are you bothered about this? I think you are worried for your and your family future.

  • Manoj

    Sharad Pawar is very selfish leader, He own property ot lacs of crores,

close