मुंबई विद्यापीठात मनविसेचा राडा : सहा जणांना अटक

January 27, 2009 7:56 AM0 commentsViews: 6

27 जानेवारी, मुंबई आशिष जाधव मुंबई विद्यापीठाच्या सायन्स लॅबोरेटरी हॉलवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या राडा याप्रकरणी मनविसेचा अध्यक्ष आदित्य शिरोडकरसह सहा जणांना अटक करण्यात आलीय. मनविसेनं इमारतीवर सोडा-बॉटलच्या बाटल्याही फेकल्यात. यामुळे इमारतीची काही प्रमाणात नासधूस झालीये. जास्त नासधुस मुंबई विद्यापीठाच्या रजिस्ट्रार रूमची झाली आहे. परराज्यातील विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी विद्यापीठात समाजशास्त्राचा विषय ठेवण्यात आला आहे. तो काढून टाकण्यात यावा ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची प्रमुख मागणी आहे. गुणपडताळणी नीट वेळेवर होत नाही, यावरूनही मनविसेनं राडा केला आहे. या राडा प्रकरणी मनविसेच्या सहा कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर आयपीसी 352 हे कलम लावण्यात आलं आहे. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केल्याचा अजामीनपात्र गुन्हा या कार्यकर्त्यांवर दाखल केला आहे. मनविसेच्या हल्ल्या दरम्यान विद्यापीठात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

close