आरोग्य केंद्र 4 वर्षांपासून उद्‌घाटनाविना धूळ खात

August 2, 2013 9:40 PM0 commentsViews: 30

JALNA HOSPITAL.transr02 ऑगस्ट : जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील डोणगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तयार होऊन तब्बल 4 वर्षं झालीत. मात्र केवळ उद्‌घाटन न झाल्यानं ही इमारत तशीच पडून आहे. सध्या भाड्याच्या अपुर्‍या जागेत आरोग्य केंद्राचं काम सुरू आहे.

या दवाखान्यात मागील 6 महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत परिसरातील 15 गावं येतात. इथल्या गर्भवती महिलांची आरोग्य सेवेविना हेळसांड होतेय. दवाखान्याची नवीन इमारत गवताच्या विळख्यात सापडली आणि आता जनावरांसाठी कुरण म्हणून उपयोगात येतेय.

या इमारतीच्या बांधकामावर दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 4 वर्षांनंतरही आरोग्य विभागाला उद्घाटनासाठी मुहूर्त सापडलेला नाही. याबाबत आरोग्य विभागाचे अधिकारी मात्र आचारसंहितेचं कारण पुढे करत बोलण्यास नकार देत आहे.

close