श्रीराम सेनेचा संघ परिवाराशी संबंध नाही : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची सारवासारवी

January 27, 2009 8:22 AM0 commentsViews:

27 जानेवारी, मंगलोर मंगलोरमध्ये एका पबवर हल्ला करणार्‍या श्रीराम सेनेचा संघ परिवाराशी संबंध नसल्याची सारवासावर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी केलीये. तर पबवरच्या हल्लाप्ररकरणी कर्नाटक सरकारनं केलेल्या कारवाईवर समाधानी असल्याचं भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंग यांनी सांगितलं आहे. आणखी दोन जणांना मंगलोरमध्ये पबवर झालेल्या हल्लाप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कर्नाटकच्या डीजीपींनी या प्रकरणी मीडियालाच दोषी ठरवंल होतं. डीजीपींची ही भूमिका चुकीची असल्याचं राजनाथसिंग म्हणाले. सेनेवर बंदी घालण्याबाबत त्यांनी कुठलंही ठोस आश्वासन दिलं नाही. चौकशीनंतरच त्याबाबत निर्णय घेऊ असं ते म्हणाले. दरम्यान श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांच्या अटकेप्रकरणी मंगलोरमध्ये पत्रकारपरिषद घेण्यात येणार आहे. श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. त्यांना बंगळुरू पोलिसांनी अटक केलं आहे.

close