‘..मग गुजराती लोकं गुजरातला का जात नाहीत?’

August 3, 2013 3:41 PM0 commentsViews: 1655

Image img_177442_niteshraneq_240x180.jpg03 ऑगस्ट :स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांच्या गुजराती लोकांबद्दलच्या ट्विटमुळे वाद निर्माण झालाय. गुजरातचा जर इतका विकास होत असेल तर नरेंद्र मोदी यांच्याच राज्यातले त्यांच्या समाजाचे लोक मुंबईत राहण्यापेक्षा गुजरातला परत जावं असं ट्विट नितेश राणेंनी केलं होतं.

राणे यांच्या विधानामुळे विधान परिषदेतही शुक्रवारी हा मुद्दा चांगलाच गाजला. नितेश राणे यांचं ट्विट नरेंद्र मोदी आणि गुजराती लोकांचा अपमान करणारं असल्याचा आरोप भाजपनं केलाय. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीच भाजपने केलीय.

दरम्यान, महाष्ट्रात सर्वाना राहण्याचा अधिकार आहे, नितेश राणे यांनी गुजराती समाजासंदर्भात केलेल्या वक्तव्याची पोलीस खात्याकडून चौकशी केली जाईल जर यात समाजात तेढ निर्माण करण्यात प्रयत्न होत असेल तर कारवाई केली जाईल असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी आज नागपूरात स्पष्ट केलं.

close