विदर्भात धरणं ओव्हरफ्लो, गोसीखुर्दचे 33 दरवाजे उघडले

August 3, 2013 2:39 PM0 commentsViews: 779

vidharbha full03 ऑगस्ट : विदर्भात पाऊस ओसरला असला तरीही पूरपरिस्थिती गंभीर बनलीय. आज गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे 3 मीटरनं उघडण्यात आल्यानं वैनगंगा नदीनं उग्र रुप धारण केलंय. प्राणहिता नदीही धोक्याच्या पातळीपेक्षा वर वाहत आहे.

चंद्रपूर शहराला इरई धरणाच्या पाण्याचा वेढा पडलाय. यामुळे 25 टक्के शहर जलमय झालंय. परिणामी शहरातल्या 1,000 कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलंय. एनडीआरएफएचे जवान बचावकार्यासाठी पोचलेत. तर गडचिरोलीतही पूरस्थिती गंभीर असून इथल्या अनेक गावांमध्ये पाणी घुसलंय.

यवतमाळमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीय. 5 प्रकल्पांचे 41 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैनगंगा आणि आदान नदीला पूर आलाय. या पुरामुळे तालुक्यातल्या जुगाद,चिंचोली आणि शिवानी तर झारी तालुक्यातल्या दिग्रस, दुर्भा आणि धानोरा गावात पाणी घुसलंय.

पाणी वाढल्यामुळे लोक घराच्या छतावर आसर्‍यासाठी गेले असून त्यांच्याकडे अन्नधान्य आणि पाणीही संपलंय. या गावांमध्ये 800 पेक्षा जास्त लोक अडकून पडले असून त्यांना सुरक्षीत स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. मात्र प्रशासनाकडे पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. पुराच्या पाण्यात 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर परिस्थीती अजूनही बिकट होऊ शकते.

close