कर्जतला कुपोषणाचा विळखा, 253 मुलं अति कुपोषित

August 3, 2013 2:47 PM0 commentsViews: 148

Image img_186412_kuposhan_240x180.jpg03 ऑगस्ट : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कुपोषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललीय. हा तालुका आदिवासी बहुल असला तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या घरांमध्येही कुपोषित मुलं आढळतायत. कर्जत तालुक्यात 1 हजार 517 कुपोषित मुलांपैकी 253 मुलं अति कुपोषित आहेत. नेरळमधल्या धामोते, आंबिवली, काठेवाडी, भागुचीवाडी, ममदापूरवाडी या भागात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. व्हीसीडीसी कार्यक्रमांतर्गत इथल्या मुलांवर उपचार सुरू असल्याचं अधिकारी सांगत आहेत.

close