‘व्यक्तिगत कारणांमुळे पोलिसांच्या आत्महत्या’

August 3, 2013 7:16 PM0 commentsViews: 561

Image img_222072_rrpatilonsheti_240x180.jpg03 ऑगस्ट : राज्यात पोलीस कर्मचार्‍यांच्या वाढत्या आत्महत्येच्या घटना चिंतेचा विषय बनल्याय. याबाबत गृहविभागाने अभ्यास सुरु केला असून या आत्महत्यांमागे पोलीस कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक अडचणी अथवा अन्य कारणं असल्याचा दावा गृहमंत्री आर आर पाटील यांनी केलाय. तसंच पोलिसांना राज्य सरकारकडून सोईसुविधा पुरवल्या जातात त्यात आणखी वाढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असं त्यांनी सांगितलं.

 
पंचविशीखाली तरूणांना मद्य दिल्यास कारवाई
तसंच राज्यात 25 वर्षाच्या खालील तरुणांना मद्य विक्री करणार्‍यांवर कारवाई केली जाईल अशी माहिती आर.आर.पाटील यांनी दिली. .त्यामुळे दारूची दुकानं, पब्स आणि बिअर बार यांनी 25 वर्षांखालच्या व्यक्तींना मद्य विकू नये, अशी सुचनाही आर आर पाटील यांनी दिली. सध्याच्या कायद्यानुसार ही कारवाई केली जाऊ शकते. आणि त्यामुळे नव्या कायद्याची गरज नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

close