‘मी आहे तुमचा मित्र आरजे सोहम’!

August 3, 2013 7:10 PM0 commentsViews: 1358

दीप्ती राऊत, नाशिक

03 ऑगस्ट : नमस्कार मित्रांनो… तुम्ही एकत आहात रेडिओ विश्वास…90.10 एफएम…आपला शो सुरू झालाय आणि मी आहे तुमचा मित्र आरजे सोहम…अशी साद घालणार हा आरजे आहे 13 वर्षांचा नाशिकचा सोहम सोनार..क्रिकेट आणि कॉमेंट्री हे सोहमचे वीकपॉईंट्स आहेत.आणि त्यामुळेच सध्या आरजे सोहम नाशिकमध्ये एकदम हिट झालाय.

13 वर्षांचा हा सोहम आहे सध्या 9वीत आहे. अभ्यास, शाळा सांभाळून तो सध्या नाशिककरांचा लाडका आरजे झालाय. आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचत असतो नाशिकमधल्या रेडिओ विश्वासमधून…शहरात रॉक्स हा त्याचा टेक्नॉलॉजीवरचा फेव्हरेट शो सध्या एकदम रॉकिंग आहे. गाणी ऐकवत मधून मधून तो तुम्हाला खूप सारी माहिती देत असतो. फेसबुकचा रंग निळाच का हो? सगळ्यांनाच माहितीए फेसबुकचा शोध कोणी लावला? असा सवाल ते क्रिकेट कॉमेंट्री हा तर सोहमचा वीक पॉईंट…मुळात क्रिकेटकडूनच सोहम कॉमेंट्रीकडे वळलाय.

‘मी आधी क्रिकेट खेळायचो. एकदा सिलेक्शनला गेलो तर 1 हजार मुलं होती. काय करावं….टीव्ही म्युट करून घरीच प्रॅक्टीस केली कॉमेंट्रीची असा अनुभव सोहम सांगतो. पण त्यांचं हे टॅलेण्ट त्याच्या आईवडलांनी ओळखलं.

‘आई-वडील म्हणून आम्ही त्याच्यातला स्पार्क ओळखला आणि त्याचा आत्मविश्वास वाढवला. हर्षा भोगले, वि.वि.करमरकर यांची भेट घेतली. त्यांचं मार्गदर्शन घेतलं, पुस्तकं, सीडीज आणल्या आणि आज तो आर जे झाला याचा आनंद आहे असं सोहमच्या आई वैशाली सोनार अभिमानाने सांगतात.

सोहम म्हणतो, हर्षा भोगले म्हणाले, फक्त कॉमेंट्रीच्या पुढे विचार कर.आवाजाचा आपण खूप उपयोग करू शकतो, डबिंग, रेडिओसाठी. त्याचवेळी रेडिओ विश्वासची जाहिरात आली होती. मी पॅशन म्हणून अर्ज केला आणि त्यांनी मला संधी दिला.

हा देशातला सर्वात लहान आरजे आहे असं रेडियो विश्वास डायरेक्टर विश्वास ठाकूर कौतुकाने सांगता. अशी आहे या लिटील स्टार आरजेची गोष्ट मग कधी नाशिकला गेला किंवा नाशिककर असालाच तर आरजे सोहमला नक्की भेटा…

close