अफगाणिस्तानात भारतीय दुतावासावर हल्ला,9 ठार

August 3, 2013 10:18 PM0 commentsViews: 159

afagan03 ऑगस्ट : अफगाणिस्तानच्या जलालाबादमधल्या भारतीय दुतावासावर हल्ला झालाय. इंडो तिबेटीन बॉर्डर पोलीसच्या डीजींकडून मिळालेल्या माहितीनुसार दुतावासातील सर्व भारतीय कर्मचारी सुखरूप आहेत.

पण या आत्मघातकी हल्ल्यात दुतावासालगत असलेल्या एका मशिदीमधल्या नऊ जणांचा मृत्यू झालाय. यात आठ लहान मुलांचा समावेश आहे.

तसंच तीन हल्लेखोरांचाही या हल्ल्यात मृत्यू झालाय. भारतीय दुतावासावरचा हा हल्ला मात्र आपण केला नाही असा खुलासा तालीबानने केला.

close