माजी आमदारांना महिना 40 हजार रुपये पेन्शन

August 5, 2013 2:43 PM0 commentsViews: 843

Image img_123392_mla34_240x180.jpg05 ऑगस्ट : माजी आमदारांना आता महिन्याला तब्बल 40 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या 822 माजी आमदार आणि त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या 750 कुटुंबीयांना याचा फायदा होईल. पावसाळी अधिवेशात 15 हजार रूपयांची वाढ सुचवणारं पेन्शन सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. यामुळे सरकारी तिजोरीवर 30 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

 

एखाद्या आमदारानं पाच वर्षांची एक टर्म पूर्ण केली असेल तर त्याला 50 हजार रूपये इतकं पेन्शन मिळणार आहे. तर पाच टर्म पूर्ण करणार्‍या माजी आमदाराला महिन्याला लाखभर रूपये पेन्शनच्या रुपात मिळणार आहेत. यासोबतच मुंबईतल्या आमदार निवासांमध्ये त्यांच्यासाठी खोल्याही आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.

 

ही पेन्शनची रक्कम आमदारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसाला मिळण्याची तरतूदही सुधारणा विधेयकात करण्यात आलीय. याबरोबर प्रत्येक माजी आमदाराला त्यानं दिलेल्या सेवेच्या प्रत्येक वर्षासाठी 2 हजार रूपयेही देण्यात येणार आहेत. यावर वित्त विभागानं नकारात्मक मत दिलं होतं. मात्र वित्त विभागाचं मत विचारात न घेता मंत्रिमंडळाने बैठकीत सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली. त्यानंतर विधानसभेत हे विधेयक चर्चेविनाच मंजूर करण्यात आलं. लोकसभेच्या माजी खासदारांना मिळणार्‍या पेन्शनची रक्कम दरमहा 20 हजार इतकी आहे.
 

आमदारांना पेन्शन

  • -गुजरात – पेन्शन नाही
  • -हरियाणा – 13,750 + महागाई भत्ता
  • -मध्यप्रदेश – 7000 + 300
  • -छत्तीसगड – 16,000 + (फॅमिली पेन्शन 1000)
  • -तामिळनाडू – 12000 + (फॅमिली पेन्शन 50%)
  • -हिमाचल प्रदेश – 18000 + (फॅमिली पेन्शन 50%)
  • -राजस्थान – 7500 + (फॅमिली पेन्शन 2500)
  • -कर्नाटक – 26000 + ( फॅमिली पेन्शन 50%)
close