‘तेलंगणाप्रमाणेच आम्हालाही स्वतंत्र राज्य द्या’

August 5, 2013 3:03 PM0 commentsViews: 359

delhi andolan05 ऑगस्ट : तेलंगणाप्रमाणेच आम्हालाही छोटी राज्यं द्या अशी मागणी करत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात झालीय. तेलंगणाच्या निर्मितीवरून राज्यसभेत गदारोळ झाल्यामुळे कामकाज दोन वेळा बंद पडलं. एकीकडे तेलंगणावादी आणि विरोधी खासदारांमध्ये चकमक झाली.

तर दुसरीकडे बोडोलँड आणि गोरखालँडच्या मागण्यासांठी स्थानिक खासदार आक्रमक झाले. विदर्भातले खासदार संसदेत आक्रमक नसले. तरी संसदेच्या बाहेर जंतर मंतर मैदानावर मात्र सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन केलं.

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत आंदोलन केलं जातंय.  आत्तापर्यंत फारसे सक्रीय नसलेले विदर्भातले सर्वपक्षीय नेते आता सक्रीय झालेत. विदर्भ संयुक्त कृती समितीचे 600 कार्यकर्तेही जंतर मंतर इथल्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

केंद्रीय मंत्र्यांना आणि खासदारांना या मागणीवर विचार करायला भाग पाडू, असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिलाय. नागपूरचे काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीला पाठिंबा दिलाय. पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मागणीला विरोध दाखवलाय. तसंच केंद्र सरकारनेही दखल घेतली नाहीये.

close