सालेमचा परतीचा मार्ग बंद, प्रत्यार्पण वैध

August 5, 2013 2:17 PM0 commentsViews: 216

salem attack05 ऑगस्ट : कुख्यात गुंड अबू सालेमच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय. 1993 बॉम्बस्फोट खटला सुरूच राहणार आणि अबू सालेमचं पोर्तुगालमधून झालेलं प्रत्यार्पण वैध आहे असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय . पोर्तुगाल कोर्टाचा निर्णय आम्हाला बंधनकारक नाही असंही कोर्टाने सुनावलं.

दरम्यान, सालेमवरचे काही आरोप मागे घेण्याची कोर्टाने सीबीआयला परवानगी दिलीय. पोर्तुगाल सुप्रीम कोर्टाने सालेमचं हस्तांतरण रद्द केल्यावर आपल्यावरचे सगळे खटले रद्द करावे अशी याचिका सालेमने सुप्राीम कोर्टात केली होती. सालेमला जन्मठेप देण्यात येणार नाही आणि 25 वर्षांच्यावर कारावास भोगावा लागणार नाही या अटींवर सालेमला 2005 साली भारतात पाठवण्यात आलं होतं.

close