मास्तर तुम्हीसुद्धा?,भरसभेत शिक्षकांची हाणामारी

August 5, 2013 5:32 PM2 commentsViews: 1246

05 ऑगस्ट : शिक्षक हा समाजाचा आरसा…पण या शिक्षकी पेशालाच शिक्षकांनी काळीमा फासल्याची घटना धुळ्यात घडलीय. सरकारी कर्मचार्‍यांच्या बँकेच्या वार्षिक सभेत धुळ्यातल्या शिक्षकांनी एकच गदारोळ घातला. साक्रीमध्ये या बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा होती. भर सभेत शिक्षकांनी एकमेकांवर अर्वाच्य शिवीगाळ करत तुफान मारामारी केली. विद्यार्थ्यांना शिस्त शिकवणारे हे शिक्षक स्वत:च हमरीतुमरीवर आले होते. या प्रकरणी साक्री पोलीस स्टेशनमध्ये सहा शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Rajendra Patil

    wawa Guruji Changale aahe.

  • Nitin Shelar

    kay karava deshala.hasav ki radava.desh chalavneryana nitimatta navalahi nahi mag shikshakankadun kadul kasli apeksha

close