कोल्हापूर: वार्षिक सभेत शिक्षकांची हुल्लडबाजी

August 5, 2013 5:48 PM0 commentsViews: 405

05 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सभा नुकतीच पार पडली. पण या बैठकीत दरवर्षीप्रमाणे गोंधळ झाला. या बैठकीत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे आणि हुल्लडबाजीचे प्रकारही घडले. त्यामुळे शिक्षकांच्या या राड्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक पतसंस्था चर्चेत आली. प्रचंड घोषणाबाजीत अनेक ठराव मंजूर करण्यात आले. या बैठकीला मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

close