स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाकडे विदर्भाच्याच खासदारांची पाठ

August 5, 2013 7:06 PM3 commentsViews: 470

VIDARBHA JANTAR_mantar andolanअमेय तिरोडकर, नवी दिल्ली
05 ऑगस्ट : तेलंगाणाच्या निर्मितीनंतर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीने पुन्हा एकदा उचल खाललीये. विदर्भातल्या वेगवेगळ्या संघटनांनी आज थेट दिल्लीत धडक देऊन जंतरमंतर इथं आंदोलन केलं. पण एरव्ही पत्रं लिहिणारे आणि पत्रकार परिषदा घेणारा एकही खासदार तिथे फिरकले सुद्धा नाही.

तेलंगणाच्या निर्मितीनंतर.. निपचित पडलेल्या विदर्भाच्या आंदोलनाला पुन्हा जाग आलीये. आत्तापर्यंत फारसे सक्रीय नसलेले विदर्भ संयुक्त कृती समितीचे नेते 600 कार्यकर्त्यांसोबत दिल्लीतल्या जंतरमंतरमध्ये धडकले आणि विदर्भला वेगळ्या राज्याचा दर्जा द्या, अशी मागणी केली. पण या आंदोलनाकडे विदर्भातल्या सर्व खासदारांनी मात्र पाठ फिरवली.

भाजपचे अजय संचेती सोडले, तर एकही खासदार या राजधानीतल्या आंदोलनात सहभागी झाला नाही. काँग्रेस-भाजपच्या मोठ्या नेत्यांनी दांडी मारली, तरी जंतरमंतरला परिचयाचे असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी मात्र स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा जाहीर केला. तेलंगणाच्या मुद्द्यासाठी सर्व नेत्यांनी अनेक वेळा राजीनामे दिले. पण विदर्भाच्या मुद्द्यासाठी एकही खासदाराने साधी उपस्थितीही नोंदवली नाही.

  • Anil Jadhav

    असे नाही का करता येणार? विदर्भाला काहीशी स्वायतत्ता देऊन वैदार्भवासियांचा असंतोष दूर करता येईल..विदर्भाला वेगवेगळी packages जाहीर करण्यापेक्षा विदर्भाचा अर्थसंकल्प पूर्णपणे वेगळा मांडता येईल.. पण विदर्भाची चूल वेगळी मांडणे हे सच्च्या मराठी मनासाठी अत्यंत दुखदायी असेल ..हा शिवरायांचा, मराठी महाराष्ट्र एकसंध राहिला पाहिजे..

  • Yuvraj P

    and who are these people i am born & brought up in nagpur never seen them who are they????everyone was paid to go to delhi many are not even born here and dont even know marathi…how can they make a demand of dividing maharashtra

  • Yuvraj P

    this is not at all a correct thing all the learned people of vidarbha are against this demnd becoz they know the consequences of it…marathi ,manus will be thrown out by these non marathi people

close