खड्‌ड्यांविरोधात सांगलीकरांचा महामोर्चा

August 5, 2013 7:52 PM0 commentsViews: 58

sangalikar morcha05 ऑगस्ट : कोल्हापूरमध्ये आज सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं विभागीय कार्यालयावर खड्‌ड्यांविरोधात महामोर्चा काढला. हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. सांगली जिल्ह्यात मंत्र्यांची संख्या मोठी असतानाही सांगली शहरासह वाळवा, पलूस आणि तासगाव तालुक्यांमध्ये सध्या खड्‌ड्यांचं साम्राज्य आहे. दरम्यान, या मोर्चासाठी पोलिसांनी नियोजन न केल्यामुळे वाहतूक खोळबंली होती. स्टेशन रोड परिसरात सुमारे 3 तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

close