बाम वाटप, खड्‌ड्यांविरोधात अनोखं आंदोलन

August 5, 2013 8:01 PM0 commentsViews: 269

AMBERNATH_KHADDE andolan05 ऑगस्ट : अंबरनाथ शहरात खड्‌ड्यांच्या विरोधात आज स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपहासात्मक आंदोलन केलं. रस्त्यांवर पडलेल्या खड्‌ड्यांमुळे नागरिकांना पाठदुखी, अंगदुखी तसंच डोकेदुखी असे त्रास होऊ लागले आहेत. यावर उपाय म्हणून स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना बामच्या बाटल्या वाटल्या. तर दुचाकी स्वारांसाठी खड्डे वाचवा आणि बक्षीस जिंका अशा स्पर्धेचं आयोजन पण करण्यात आलं होतं. जोपर्यंत शहरातल्या रस्ते सुस्थितीत होणार नाही तो पर्यंत स्वाभिमान संघटनेचं आंदोलन सुरूच राहील असं संघटनेनं जाहीर केलंय.

close