प्रतिबिंब नाट्य उत्सवाला सुरूवात

August 5, 2013 9:34 PM0 commentsViews: 51

05 ऑगस्ट : एनसीपीए आयोजित प्रतिबिंब नाट्य उत्सवाला ड्रीम सोसायटी या नाटकाच्या प्रयोगाने सुरुवात झाली आहे. प्रायोगिक रंगभूमीची चळवळ पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने एकूण सहा प्रायोगिक नाटकांचं आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान एनसीपीएइथे सुरु राहणार आहे. रविवारी या महोत्सवात सदानंद मोरे,धर्मकिर्ती सुमंत लिखित ‘शिवचरित्र आणि एक’ त्याचबरोबर सतीश आळेकर लिखित ‘एक दिवस मठाकडे’ हे दीर्घांकं सादर झाले.आज समीर गरुड लिखित ‘खून करायचाय’ हे नाटक सादर होणार आहे.या महोत्सवाला जास्तीत जास्त रसिकांनी यावं असं आवाहन आयोजकांनी केलंय.

close