‘बजाज’चे कामगार 42 दिवसांपासून संपावर

August 5, 2013 9:51 PM0 commentsViews: 314

bajaj pune05 ऑगस्ट : पुण्यातील बजाज कंपनीतला कामगार विरुद्ध व्यवस्थापन असा वाद चांगलाच पेटलाय. कामगार एक आठवड्यात कामावर आले नाहीत तर 50 टक्के उत्पादन औरंगाबाद आणि पंतनगर इथं हलवावं लागेल असा इशारा बजाज ऑटोचे एम.डी. राजीव बजाज यांनी दिलाय.

 

बजाज यांनी कामगारांनी सात दिवसात कामावर परतावं असं आवाहनही केलं आहे. एक तर व्हीआरएस घ्या किंवा कामावर या किंवा मग कामच सोडा अशा शब्दात बजाज यांनी कामगारांना इशारा दिलाय. 22 कामगारांची सध्या चौकशी सुरू आहे. त्यांना बिनशर्त कामावर घेण्यात यावं, कंपनीतले एक रुपया दरानं पाचशे शेअर्स मिळावेत तसंच नवीन वेतन करार करण्यात यावेत अशा कामगारांच्या मागण्या आहेत. या सगळ्या मागण्यांकरिता कामगारांनी गेल्या 42 दिवसांपासून संप पुकारलाय.

close