छोटू माळी हत्या प्रकरणी सेना नगरसेवक हळदगणकरांना अटक

August 5, 2013 11:04 PM0 commentsViews: 195

CHOTU MALI3405 ऑगस्ट : नवी मुंबईत झालेल्या छोटू माळी हत्या प्रकरणाला नवं वळण लागलंय. छोटू माळी हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता. या हत्या प्रकरणाचा तपास रबाळे पोलिसांनी करून या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यांनी गुन्हाही कबूल केला होता. मात्र पंधरा दिवसात या प्रकरणी शिवसेना नगरसेवक मनोज हळदणकर यांचं नाव पुढे आलं आणि राजकीय खळबळ उडाली. मनोज हळदणकरांना आता याप्रकरणी अटक करण्यात आलीय. यामागे नेमकं राजकारण आहे की आणखी काही याबाबत आता नवी मुंबईत राजकीय चर्चांना ऊत आलाय. या घटनेमागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप स्थानिक शिवसेना नेत्यांनी केलाय.

close