पाकचा भारतीय सैनिकांवर हल्ला, 5 जवान शहीद

August 6, 2013 3:58 PM4 commentsViews: 1143

Image img_227742_locboradarpakvsindia_240x180.jpg06 ऑगस्ट : एकीकडे मैत्रीचा हात पुढे करणार्‍या पाकिस्तानने पुन्हा एकदा ना’पाक’ हल्ला केलाय. पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू आणि काश्मीरमधल्या पूँछ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याच्या गस्तपथकावर हल्ला केला. नियंत्रणरेषेजवळ चाकन दा बाग या गावात ही घटना घडली. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. संरक्षण क्षेत्रातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ते 16 पाकिस्तानी सैनिकांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर भारतीय हद्दीत घुसखोरी केली. त्यानंतर त्यांनी भारतीय हद्दीत सरल चौकीच्या गस्तपथकावर हल्ला चढवला. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्ताननं भारतीय हद्दीत गोळीबार केल्याच्या घटनांमध्ये वाढ झालीये. जुलैमध्ये पाकिस्तानच्या सैन्यानं केलेल्या हल्ल्यांमध्ये बीएसएफचे काही जवान जखमी झाले होते. या हल्ल्याचा भारत-पाकिस्तान शांतता चर्चेवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.

 • Rohit Ghorpade

  Jaat asli aahe ya pakistan chi patimagun vaar karaychi

 • Yogesh Gawande

  Jar asach chalu rahila tar ek divas Bhartiya sainyat koni bharti vyayla tayar honar nahi.. ani vyaycha tari kashala? Roj yenara divas shatruchya golichi vaat baghat kadhaycha ani jya divshi goli aali tya divshi maraycha..

 • Sham Dhumal

  “२०१४ च्या निवडणुकीकडे ज्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे, त्यांना
  सीमेवरील घटनांचे गांभीर्य काय कळणार?”
  कारण नेत्यांच्या संरक्षणासाठी जनतेचा अफाट पैसा खर्च केला जातो.
  त्यामुळे जनता किंवा जवानांच्या मृत्युचे सुख-दु:ख त्यांना वाटत नसावे.
  भारतीय संरक्षण मंत्र्यांना पाकिस्तानी सैन्यावर फारच विश्वास दिसतो आहे.
  पाकीस्तानला फायदेशीर असेच वक्तव्य कॉंन्ग्रेस नेत्यांकडुन अनेकदा
  केले जाते. त्यावेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी कुठे असतात?
  समजा पाकीस्तानने २ भारतीय मंत्र्यांची मुंडकी कापून नेली असती
  तर भारत सरकारची आता आहे तीच भूमिका राहिली असती का?

 • sanjay shinde

  balasahebanchaya hatat sata ali asti tar pakistanala palun laval ast jay maharashtra!

close