पाक हल्लाचे संसदेत तीव्र पडसाद

August 6, 2013 3:37 PM1 commentViews: 400

Image img_236592_loksabha4_240x180.jpg06 ऑगस्ट : पाकिस्तानने सीमेवर केलेल्या हल्लाचे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पडसाद उमटले. या हल्ल्यांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं, यामुळे कामकाजात अडथळे आले. याशिवाय तेलंगणा आणि इतर मुद्द्यांवरूनही कामकाजात अडथळे आले. यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आलं.

दुपारी बारा वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले. संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांनी या विषयावर निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. पण कार्यक्रमपत्रिकेप्रमाणे अँटोनी यांनी उत्तराखंडमधल्या मदतकार्यावर निवेदन केलं.

त्यामुळे संतप्त झालेले विरोधक वारंवार त्यांच्या भाषणात अडथळे आणत होते. लोकसभेच्या सभापती मीराकुमार वारंवार त्यांना समज देत होत्या, पण विरोधक त्यांचं ऐकत नव्हते. गदारोळानंतर पुन्हा एकदा लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

  • Mandar Kadam

    PAKISTANLA TYANCHYA BHASHET UTTAR DYA…

close