श्रीराम सेनेचा प्रमुख प्रमोद मुतालिकला अटक

January 27, 2009 4:33 PM0 commentsViews: 5

27 जानेवारी, बेळगावश्रीराम सेना या हिंदुत्त्ववादी संघटनेचा अध्यक्ष प्रमोद मुतालिक याला आज संध्याकाळी बेळगावमध्ये अटक करण्यात आली. श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल मंगलोरमधल्या एका पबवर हल्ला केला होता. आणि तिथे आलेल्या तरुणींना मारहाण करून पळवून लावलं होतं. पबमध्ये जाणं भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध असल्याचं मुतालिक यांचं म्हणणं आहे. काल झालेल्या हल्ल्यानंतर मुतालिक यांच्या अटकेच्या मागणीने जोर धरला होता. पण मुतालिक हल्ल्याच्या ठिकाणी उपस्थित नव्हता. त्यामुळं त्याला गेल्या वर्षी धारवाडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक होण्यापूर्वी मुतालिकने मुलींना मारहाण केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

close