विदर्भासाठी भाजप शिष्टमंडळाच्या भेटीगाठी

August 6, 2013 2:50 PM0 commentsViews: 176

bjp meet06 ऑगस्ट : भाजपच्या विदर्भातील नेत्यांनी आज स्वतंत्र विदर्भासाठी दिल्लीतील भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या नेत्यांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, खासदार अजय संचेती यांच्यासह 9 आमदार आणि इतर स्थानिक नेत्यांचा समावेश होता सकाळी या शिष्टमंडळानं भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेतली. तर संसद भवनात सुषमा स्वराज आणि अरुण जेटलींची भेट घेतली. स्वतंत्र तेलंगणाचं विधेयक ज्यावेळी सभागृहात आणलं जाईल तेव्हा याच विधेयकात स्वतंत्र विदर्भासाठीची दुरुस्ती भाजपनं सुचवावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.

close