दुर्गा नागपाल यांना वक्फ बोर्डाचा पाठिंबा

August 6, 2013 1:31 PM0 commentsViews: 278

duraga shati nagpal06 ऑगस्ट : उत्तर प्रदेशमधल्या निलंबित आयएएस अधिकारी दुर्गा नागपाल यांना आता वक्फ बोर्डाचा पाठिंबा मिळालाय. मशिदीची भिंत पाडण्याचे आदेश नागपाल यांनी दिलेच नव्हते, असं वक्फ बोर्डाशी संबंधित एका कमिटीनं म्हटलंय.

नागपाल या वाळू माफियांच्या विरोधात कारवाई करत होत्या असं बोर्डानं म्हटलंय. नागपाल यांचं निलंबन मागे घ्या अशी विनंती करणारं पत्र आपण पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लिहिणार आहोत असं वक्फ बोर्डाचे सचिव म्हणाले आहे.

या कमिटीच्या रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की, वाळू आणि भूमाफियांनी वक्फ बोर्डाची जमीन बळकावलीय आणि नागपाल यांनी ती जमीन परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. वक्फ बोर्डाच्या या भूमिकेमुळे आता या मुद्द्यावर समाजवादी पक्ष एकटा पडलेला दिसतोय.

 

close