ना’पाक’ हल्ल्यात मराठा रेजिमेंटचे कुंडलिक माने शहीद

August 6, 2013 6:17 PM2 commentsViews: 2322

kundlik mane06 ऑगस्ट : पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्राचे वीर जवान शहीद झालेत. मराठा रेजिमेंटचे कुंडलिक माने या हल्ल्यात शहीद झालेत. तर मराठा रेजिमेंटचे संभाजी कुंटे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर लष्काराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांच्यासह बिहार रेजिमंटचे 4 जवान शहीद झाले आहेत. शहीद जवान पुंडलिक माने हे कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील पिंगळगावचे रहिवासी होते.

 

माने यांच्या कुटुंबीयांना मदत आणि पुनर्वसन खात्यातर्फे 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली अशी घोषणा मदत पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस यांनी केली. तसंच मानेंच्या कुटुंबीयांना जास्त जास्तीत मदत मिळवून देण्याचं आश्वासनही धस यांनी दिलंय.

 

सोमवारी मध्यरात्री पाक सैनिकांनी जम्मू आणि काश्मिरमधील पूँछ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याच्या गस्ती पथकावर हल्ला केला. नियंत्रणरेषेजवळ चाकन दा बाग या गावात ही घटना घडली. त्यात पाच जवान शहीद झाले. तर एक जवान जखमी झाला. संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार पाक लष्कराच्या गणवेशातल्या जवानांसह 20 जणांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला. आणि त्यांनी भारतीय हद्दीत चौकीच्या गस्तपथकावर हल्ला चढवला. या हल्ल्याचे संसदेत तीव्र पडसाद उमटले तर देशभरातून या हल्लाचा निषेध केला जात आहे.

  • vinayak dhumal

    may rest in peace

  • rushikesh chitrakar

    soul of our brave Jawans rest in peace, I salute them from bottom of my heart.
    (enough is enough now Indian army should retaliate intensely against Pakistan.)

close