ओरंगाबादेत कर्जमाफीचा निव्वळ दिखावा

January 27, 2009 4:16 PM0 commentsViews: 4

27 जानेवारी, औरंगाबादसंजय वरकडराज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत मराठवाड्यातील सात लाख शेतकर्‍यांसाठी जिल्हा बँकांना साडे बाराशे कोटी रूपये मिळणार आहेत. पण त्यापैकी पाच लाख शेतकर्‍यांना आधी थकित रक्कम भरावी लागणार आहे, त्यामुळं ही कर्जमाफी योजना म्हणजे निव्वळ फसवणुकीचा प्रकार असल्याची शेतकर्‍यांची भावना झाली आहे. विभागीय आयुक्त भास्कर मुंडे यांच्या उपस्थितीत कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीची बैठक झाली. अटी आणि आकड्यांचा गोंधळ यामुळं या बैठकीत काहीही निष्पन्न होऊ शकलं नाही. अधिकार्‍यांनी मात्र बैठक यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. "शेतकर्‍यांना पूर्ण थकित रक्कम भरायची नाहीये. त्यांना फक्त थकित हप्ते भरायचे आहेत." असं असं राज्यशासनाचे सहकार आयुक्त कृष्णा लव्हेकर यांनी सांगितलं.औरंगाबाद विभागात एकूण तीन लाख 86 हजार लाभार्थी आहेत. वीस हजारांपर्यंत कर्ज असणारे 84 हजार शेतकरी आहेत. वीस हजारांपेक्षा जास्त कर्ज असलेले तीन लाख लाभार्थी आहेत. मात्र प्र्रत्यक्षात लाभ मिळू शकणारे जेमतेम 25 हजार शेतकरी आहेत. कर्जमाफी आणि सवलतींच्या नोंदी घेण्याची आणि बॅकांना निधी मंजुर करण्याची तारीख 31 मार्च ठरविण्यात आली आहे. त्यामुळे सहकारी बॅकांचा मार्च एंड सुखावणार आहे. 31 मार्चपर्यंत बॅकांचा ताळेबंद सुधारून नोटबॅकेकडून वोट बॅकेकडे जाण्याचाच हा प्रकार आहे.शेतकर्‍यांना प्रत्यक्षात कर्जमाफी देण्याआधीच जिल्हा बॅकांना 31 मार्च रोजीच कोट्यवधी रूपये मिळणार आहेत. त्यामुळं या योजनेची अंमलबजावणी करताना खरी कसरत होणार आहे ती सहकारखात्यातील अधिकार्‍यांची.

close