पाक हल्लावरून भाजप-काँग्रेस नेत्यांची चिखलफेक

August 6, 2013 5:59 PM0 commentsViews: 614

06 ऑगस्ट : पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताचे 5 जवान शहीद झालेत. मात्र या घटनेला काही तास उलटत नाही तोच या प्रकरणावरून राजकारणाला सुरूवात झालीय. पाकच्या हल्ल्यावर संसदेनं विशेष चर्चा करावी. जर असे होत नसेल तर काँग्रेस पाकिस्तानसोबत आहेत की भारतासोबत असा संतप्त आणि खळबळजनक सवाल भाजपचे जेष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी लोकसभेत विचारला. सिन्हा यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांनी टीका केली. अशा प्रकरणावर भाजपला बोलण्याचा काहीही अधिकार नाही. एनडीएच्या काळात भारतीय सैनिकांवर वारंवार हल्ले झालेत. एवढेच नाही तर अतिरेक्यांनी संसदेवरच हल्ला केला होता मग भाजप पाकिस्तानशी मिळाले होते का? असा प्रतिसवाल काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी विचारलाय.

close