भारतीय महिला हॉकी टीमचं जल्लोषात स्वागत

August 6, 2013 9:57 PM0 commentsViews: 79

06 ऑगस्ट : महिलांच्या ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेत ब्राँझ मेडल पटकाणारी भारतीय टीम आज मायदेशात परतली. नवी दिल्ली विमानतळावर या टीमचं जल्लोषात स्वागत झालं. जर्मनीत झालेल्या ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडचा 3-2 असा पराभव करत भारताने ब्राँझ मेडल पटकावत इतिहास रचला. भारतीय महिला टीमची व्हाईस कॅप्टन राणी रामपालनं या विजयात महत्वाची भूमिका बजावली. या संपूर्ण स्पर्धेत राणीनं दमदार कामगिरी केली, याच जोरावर तिची सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही निवड झाली. हॉकी इंडियाकडून विजयी टीमचा सत्कार करण्यात येणार असून टीममधल्या प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलंय.

close