साळसकरांची बंदूक का काढून घेतली ? साळसकरांच्या पत्नीचा सवाल

January 27, 2009 4:40 PM0 commentsViews: 6

27 जानेवारी, मुंबईयावेळी बोलताना स्मिता साळसकर यांनी विजय साळसकरांची एके 56 गन मुंबई पोलिसांनी का काढून घेतली ? असा सवाल केला. मुंबईत जोगेश्वरी येथील एका उद्यानाला शहिद विजय साळसकर यांचं नाव देण्यात आलं. या कार्यक्रमाला विजय साळसकरांच्या पत्नी स्मिता आणि मुलगी दिव्या उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न विचारला."मुंबईवर हल्ला झाला आणि प्रशासन जागं झालं. पण त्याआधी पोलिसांना शस्त्र का पुरवली गेली नाहीत ? केवळ पोलीस ठाण्यात ठेवण्यासाठी शस्त्रांची खरेदी होते का ? आणि केवळ शस्सत्र असून चालत नाही, तर ती चालवण्याची हिंमत लागते. आणि साळसकरांक़े ही हिंमत होती." असं मानसी साळसकर म्हणाल्या.

close