वरळी पोलीस क्वार्टर्सला स्थगिती

August 6, 2013 10:01 PM0 commentsViews: 96

Image img_233362_rrpatil345_240x180.jpg06 ऑगस्ट : वरळी पोलीस क्वार्टर्समधल्या घरं पुनर्विकासासाठी खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. यासंदर्भात पोलीस क्वार्टर्समधल्या महिलांनी शिवसेना उपनेते अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री आर.आर.पाटील यांची भेट घेतली. घरं खाली करण्याची आजची शेवटची तारीख होती. पण या महिलांचं म्हणणं ऐकूण घेतल्यानंतर पाटील यांनी या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिलीय.

 

वरळी इथल्या पोलीस क्वार्टर्समध्ये 180 पोलीस कुटुंब राहतात. राहत्या इमारती धोकादायक असल्याचं कारण देत त्यांना घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते. या विरोधात आज इथल्या महिलांनी प्रशासन विभागाचे पोलीस सह आयुक्त हेमंत नगराळे आणि हत्यारी विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विजय चव्हाण यांच्या गाड्याही अडवल्या. ही जागा वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांना बळकायवायची असल्यानेच त्यांनी हा डाव आखल्याचं पोलीस कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

close