नंदूरबारमध्ये बेसुमार वाळू उपशामुळे भूजल पातळी धोक्यात

August 6, 2013 10:13 PM0 commentsViews: 191

Image img_136022_pne_sand.transfer.jpg568_240x180.jpg06 ऑगस्ट : नाशिकच्या अपर महसूल आयुक्तांनी नंदुरबारमधल्या ठेक्यांना संरक्षण दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. ग्रीन ट्रीब्युनलने वाळू उपशावर आक्षेप घेतले असताना, नंदुरबारमध्ये तापी नदीतून झालेला वाळू उपसा पर्यावरणास हानिकारक असल्याचा अहवाल आयबीएन-लोकमतच्या हाती लागला आहे.

31 जुलै रोजी तापी नदीवरच्या या वाळू उपशाची मुदत संपली. पण मुदतीत त्यांनी जास्तीचा वाळू उपसा केल्याचा ठपका नंदुरबारच्या जिल्हाधिकार्‍यांनी ठेवला होता. तापी नदीतल्या या वाळू उपशामुळे भूजल पातळीला धोका निर्माण झाल्याचा अहवाल भूजल वैज्ञानिकांनी दिला होता.

त्यामुळे परिसरातल्या विहिरींना धोका निर्माण झाल्याचं त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं. याच्या आधारावर नंदुरबारच्या जिल्हाधिकार्‍यांनी वाळूच्या ठेक्यांना सील केलं होतं. मात्र, ते अपीलात गेल्यावर वरिष्ठ महसूल अधिकार्‍यांनी त्यावर स्थगिती दिली होती. आता, ग्रीन ट्रीब्युनलच्या निर्णयानं महसूल यंत्रणेच्या या आदेशांची कसोटी लागणार आहे.

नंदुरबारमध्ये बेकायदा वाळू उपसा

– निश्चित केलेल्या क्षेत्राबाहेर जादा वाळू उपसा
– 5 मिटरखाली उपसा केल्यानं भूजल धोक्यात
– नदीपात्राच्या दोन्ही बाजूंनी उत्खनन
– नदीपात्रालगतच्या टेकडीचेही उत्खनन
– परिसरातल्या शेतीवर परिणाम
– डिझेलच्या अतिवापराने पाण्याचे प्रदूषण
– नदीपात्रात रस्ते बांधल्याने प्रवाहाला अडथळा

close